इचलकरंजीत अल्पवयीन मुलीसोबत घडला धक्कादायक प्रकार …

ichalkaranji crime on girl

इचलकरंजी येथील पुजारी मळा येथून अंगणात झोपलेल्या परप्रांतीय अल्पवयीन शाळकरी मुलीस अंथरुणातून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला.या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे मुलीचे (girl) नातेवाईक पोलिस ठाण्यासमोर रोज टाहो फोडत आहेत.

मूळचे उत्तर भारतीय असलेले विनोदकुमार बिंड हे गेल्या 20 वर्षांपासून परिवारासह पुजारी मळा येथे भाड्याने राहतात. ते स्वतः यंत्रमाग कामगार आहेत. राहण्याची जागा अपुरी, त्यातच उकाडा सुरू झाल्याने त्यांची मुले अंगणात झोपतात. सोमवारी (दि. 4) इयत्ता आठवीमध्ये शिकणारी मुलगी व तिचा लहान भाऊ दोघे अंगणात झोपले होते.

मध्यरात्री एकच्या सुमारास विनोदकुमार लघुशंकेसाठी उठले असता त्यांना एकटाच मुलगा अंगणात झोपल्याचे आढळले. अंथरुणात मुलगी  (girl) नसल्याचे पाहून त्यांनी पत्नीला उठवून वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे एकच आरडाओरडा सुरू झाला. रडण्याचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी आले.

मुलगीचे चप्पल दारातच होते. त्यामुळे कोणी तरी अंथरुणात झोपेत असलेल्या मुलीला पळवून नेल्याचा संशय विनोदकुमार यांनी व्यक्त केला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली.


हेही वाचा :


देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य


पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत इचलकरंजी शहराची साडेसाती संपेना


ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हॉटेल, ढाब्यांनाही आता व्यावसायिक कर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *