इचलकरंजी: या विषयावर २८ सप्टेंबरला इचलकरंजी महापालिकेत व्याख्यान

incorporate

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: इचलकरंजी महानगरपालिकेच्या(Municipal Corporation) वतीने २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिनानिमित्त प्रा.डॉ. दुर्गेश वळवी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम  या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध माध्यमांच्या द्वारे जास्तीत जास्त नागरिकांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने उद्या बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता,महा पालिकेच्या सभागृहात(incorporate)  प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर इन्स्टिट्यूट, कोल्हापूर समाजशास्त्र विभागचे प्रा. डॉ. दुर्गेश वळवी यांचे माहिती अधिकार याविषयावर व्याख्यान आयोजित केलेले आहे.

व्याख्यानासाठी  सर्व प्रथम अपील अधिकारी, जन माहिती अधिकारी, सहा. जन माहिती अधिकारी तसेच माहिती अधिकाराचे  काम पाहणारे सर्व संबंधित कर्मचाऱी उपस्थित राहाणार आहेत. या व्याख्याना साठी  शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महा पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे(incorporate).

Smart News:-