इचलकरंजी पाणी प्रश्न चर्चेतून मार्गी लागावा यासाठी सुळकुडकरांना पत्राद्वारे साद

water scheme

इचलकरंजी: शहरवासीयांसाठी महत्त्वपूर्ण असलेली दूधगंगा पाणी योजना पूर्णत्वास जावी , यासाठी दूधगंगा नदी काठावरील नागरिकांचे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी चर्चेची दारे खुली असून त्यांना विनंती पत्राद्वारे साद घालत आहोत, अशी भूमिका मी इचलकरंजीकर पाणी चळवळीच्या दुसऱ्या बैठकीत घेण्यात आली. इचलकरंजीच्या सुळकुड पाणी योजनेसाठी दुधगंगा नदी काठावरून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील खवरे मार्केटमधील शेडमध्ये ही बैठक पार पडली.(water scheme)

यावेळी तयार करण्यात आलेल्या साद पत्रात, कावीळसारख्या साथीमुळे इचलकरंजीतील ४५ हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशावेळी शुद्ध पाण्यासाठी इचलकरंजीकरांसाठी राखीव असलेल्या पाणीपुरवठ्याला गैरसमजातून झालेला विरोध दुःखदायक आहे. इचलकरंजीसाठी पाणी योजना मंजूर झाल्यास सुळकुड परिसरातील नागरिकांना पाणी कमी पडेल असा आपला गैरसमज झालेला दिसत आहे. विशेषतः जेंव्हा येथील लोक दूषित पाण्याने मृत्युमुखी पडलेले आहेत.(water scheme)

अशा परिस्थितीत पंचगंगा शुद्धीकरणासाठी इचलकरंजीकर प्रयत्नशील होते, आहेत आणि भविष्यातील असतील. जिल्ह्याचे सामाजिक ,औद्योगिक, कृषी व सहकाराचे चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आज वस्तुस्थितीचे भान ठेवून सामंजस्याची भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या योजनेमुळे सर्वांना फायदाच होणार आहे. याबाबत शंका असल्यास चर्चा करण्यास व संवाद साधण्यास इच्छुक आहोत, असे विनंती पत्रात नमूद केले आहे.

बैठकीत, इचलकरंजीवासीयांत जनजागृती करण्याच्या दृष्टीने महाविद्यालय, विविध संस्थांच्या गाठीभेटी करणे, त्यांच्याशी संपर्क साधून पाणी चळवळची व्याप्ती वाढवणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना मोठ्या प्रमाणात ईमेल पाठवणे यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली.

यावेळी राजू नदाफ, डॉ. अरुण पाटील, सर्वेश भिडे, प्रदीप कांबळे, इराण्णा सिंहासने, प्रा. युवराज मोहिते, प्रमोद इदाते, अशोक पाटणी, कौशिक मराठे, जीवन बरगे, शोभा इंगवले, आदींनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन अमित कुंभार, उमाकांत दाभोळे यांनी केले. यावेळी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Smart News:-