इचलकरंजी: मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ इचलकरंजीत शिवसैनिकांची घोषणाबाजी

इचलकरंजी: राज्यात सुरु असलेल्या शिवसेना पक्षातील बंडाळीनंतर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिकांनी येथील कॉ. मलाबादे चौकात एकत्र येत घोषणाबाजी करत पाठबळ दर्शविले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला बंडाचा पवित्रा बदलुन पुन्हा शिवसेनेत यावे, असे आवाहनही ज्येष्ठ शिवसैनिकांनी केले.
मागील चार दिवसांपासून शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राजकारणात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शिवसैनिकांनी इचलकरंजीतील कॉ. मलाबादे चौकात ठाकरे परिवाराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त शिवसैनिक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी राहिल, असा विश्वास जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, शहर प्रमुख सयाजी चव्हाण, माजी शहर प्रमुख महेश बोहरा, धनाजी मोरे, राजु आरगे, मधुमती खराडे, शोभा कोलप, माधुरी टाकरे, कल्पना देशमुख, बालाजी हलेमनी, दिलीप शिंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Smart News:-
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी २ कोरोना रूग्ण
सैंधव मिठाचे आरोग्याला होणारे फायदे
कांद्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
12GB RAM आणि 150W फास्ट चार्जिंग असलेला OnePlus 10R