इचलकरंजी: इतक्या गणेश मुर्त्यांचे पर्यावरण पूरक विसर्जन झाले.

Ganesh immersion

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहापूर खण आणि कृत्रिम तलावात ५२९ गणेश मूर्तीचे विसर्जन(Ganesh immersion) करण्यात आले.३०० अधिकारी आणि कर्मचारी यासाठी सक्रिय होते.

सप्टेंबर अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन(Ganesh immersion) पर्यावरण पुर्वक होणेसाठी महानगरपालिके कडुन तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये करावे असे आवाहन केले होते. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तीं विसर्जनाची व्यवस्था शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ ,ओपन जीम जवळ आणि बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर या ठिकाणी आणि महानगरपालिका निर्मित ५ कृत्रिम तलावामध्ये क्रेनसह विसर्जनाची व्यवस्था करणेत आलेली होती. महानगरपालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देवुन शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे विसर्जन शहापूर खण तसेच कृत्रिम तलावामध्ये करुन मौल्यवान सहकार्य केले. शुक्रवारी एकुण ५२९ गणेश मूर्तींचे विसर्जन शहापुर खण तसेच महापालिका निर्मित कृत्रिम तलावामध्ये करणेत आले.

आजच्या गणेश विसर्जन (Ganesh immersion)व्यवस्थेसाठी आयुक्त सुधाकर देशमुख सहा.आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत संगेवार, शहर अभियंता संजय बागडे, जल अभियंता सुभाष देशपांडे, नगर रचनाकार रणजित कोरे,विद्युत अभियंता संदीप जाधव, यांचेसह सर्व विभाग प्रमुख, सर्व इंजिनिअर, स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्यविभागा कडील एकुण ३०० अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या सह आधार रेस्क्यू फोर्स, स्पेशल कमांडो फोर्स, शहरातील पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक तसेच २ यांत्रिक बोटी, ४ क्रेन, २ अग्निशमन वाहन, ४ रुग्णवाहिका (इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, सेवाभारती रुग्णालय, क.बा.आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट ) यांचा समावेश होता.

महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रभारी अधिकारी तथा सुधाकर देशमुख यांनी सार्वजनिक मंडळाचे आभार व्यक्त केले .

Smart News:-