इचलकरंजीत दिंडी प्रमुखांचा सत्कार संपन्न

happiness

इचलकरंजी:- प्रत्येकाच्या जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग घडविणारा कर्ता करविता हा परमेश्‍वर आहे. कोणत्याही क्षणी काय घडवायचे हे त्याच्या हाती आहे, आपण सर्व निमित्तमात्र आहोत. म्हणूनच पुण्याईची बेरीज वाढविण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते आपण करुया. पंढरीची वारी आपल्या दारी अंतर्गत पुढील वर्षी गोरगरीबांच्या दारातून पालखी सोहळा साजरा करुया, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले(happiness ).

येथील संस्थान काळातील ग्रामदैवत श्री काळामारुती मंदिराच्या 25 व्या महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधत वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी दिंडी प्रमुखांचा सत्कार श्री काळामारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. आवाडे बोलत होते.

आमदार आवाडे यांनी, वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचा 11 वा आणि इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिराच्या 25 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच न भूतो न भविष्यती असा दिंडी स्पर्धा सोहळा संपन्न झाला. सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे व सहभागामुळे तो अविस्मरणीय ठरला. इचलकरंजीत दिंडी मार्ग नसल्याने यानिमित्ताने वारकरी दिंडीचा प्रवास इचलकरंजीकरांना प्रत्यक्ष अनुभवता आला. सर्वांनी वारकर्‍यांच्या जीवनातील आनंद अनुभवला. म्हणून आता पुढील शहरातील सर्वच भागात गोरगरीबांच्या दारात पालखी मिरवणूक सोहळा साजरा करुया, असे सांगितले(happiness ).

यावेळी मंडळाचे स्थायी अध्यक्ष नंदु उर्फ बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुभाष तोडकर, सचिव श्रीकांत टेके, खजिनदार किशोर मेटे, कार्याध्यक्ष दत्ता मेटे, सचिव सागर मुसळे, हभप महादेव चौगुले महाराज, बजरंग डोईफोडे, तात्या पुजारी, प्रमोद कावरे, मिश्रीलाल बजाज, धिरज होगाडे, मनोहर ईराणी, मारुती देशींगे, ओमप्रकाश कोठारी, गोविंद सोनी, देवराज जोशी, अलका सुर्यवंशी आदींसह भक्तगण उपस्थित होते.

Smart News:-