इचलकरंजीत ओपन बारचा सुळसुळाट, पोलिसांचे दुर्लक्ष

Open Bars

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये ओपन बारचा(Open Bars) अगदी सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे लहान मुलांना व महिलांना रस्त्यावरून फिरणे मुश्किल बनले आहे. पोलिसांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्या असून अशा ओपन बारवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

औद्योगिक शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती असल्यामुळे सर्वाधिक दाट लोकसंख्येचे शहर बनले आहे. शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच अनेक चौकामध्ये खाद्यपदार्थ आणि कोल्ड्रिंक विक्रीचे गाडी आहे. या गाड्यावर तसेच शहरातील काही रस्त्यावर ओपन बार(Open Bars) सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला लाईट नसल्याचे बघून खुलेआम तळीराम आपला तळ ठोकत असल्याचे निदर्शनास येत आहे. तीन-चार टोळक्यांना एकत्र घेऊन अंधाऱ्या रस्त्याला बसून दारू पीत असल्याचे निदर्शनास आले येत आहे.सांगली रोडवरील मुसळे हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्यावर तर रात्री महिलांना फिरणे मुश्किल बनले आहे..

या ठिकाणी हमखास काही लोक रस्त्यावर दारू पीत असल्याचे निदर्शनास येते. या परिसरात काही पोलीस अधिकारी राहण्यास आहेत. मात्र त्यांचे याकडे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या दृष्टीला ही गोष्ट पडलेली नाही की जाणून-बुजून पोलीस दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोल्ड्रिंक पिण्याच्या तसेच खाद्यपदार्थाच्या खाण्याच्या नादात अनेक ठिकाणी दारू पीत बसलेले दिसून येत आहे. विशेष करून मौसरी पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या ठिकाणी जास्त वर्दळ असते.प्रामुख्याने मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यावर पोलिसांनी जास्त खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.अशा फेरीवाल्यांच्या वर कारवाई करण्याबरोबरच तळीराम नाही रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली पाहिजेत तरच इतर प्रश्न उद्भवणार नाहीत. महिला आणि नागरिकांना दिलासा मिळेल.

Smart News:-