इचलकरंजीत गणेशमूर्तींचे स्टॉल सजू लागले

कारागीर रात्रीचा दिवस करू लागले: कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण

इचलकरंजी: शहर परिसरात गणेशमूर्तींचे (Ganesh Chaturthi)स्टॉल सजू लागले आहेत. तर कारागीर रात्रीचा दिवस करून मूर्त्या पुर्ण करण्यात मग्न आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मुर्त्यांच्या किंमतीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्यामुळे अबालवृद्धांचे लक्ष उत्सवाकडे लागून राहीले आहे.

३१ ऑगस्टला गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. अवघे २५ दिवस उत्सवासाठी उरले आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळे आत्तापासूनच तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गणेशोत्सव साजरा(Ganesh Chaturthi) करण्यावर निर्बंध घालण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक मंडळांचा हिरमूड झाला होता. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर गणेश मूर्तीच्या उंचीचे निर्बंधही उठविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात आले तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर मंडपवाले, डेकोरेशन साहीत्य, वाजंत्री यांच्यासह छोट्यामोठ्या व्यापारीवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

शहरातील विविध गाळ्यांमध्ये तस ेच स्टॉल उभारून ेशम विक्रीसाठी ठ ेवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळ अन ेक स्टॉलवर आत्तापासूनच नागरिक गर्दी करीत आहेत. तर अनेक कारागीर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्त्या पुर्णत्वास नेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. गणेशमूर्तीच्या(Ganesh Chaturthi) उंचीवरील मर्यादा उठवण्याचा निर्णय राज्यसरकारने गेल्या आठवड्यापूर्वी घेतल्यामुळे अनेक मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या मूर्त्यांचे बुकींग करण्यास सुरूवात केली आहे.

मात्र कारागीर निर्बंध लागतील या भितीपोटी मूर्त्यांच्या उंची कमी केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या वाढत्या आग्रहास्तव अनेक कारागीर मोठ्या मूर्त्यां करण्यास भर दिले आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते उत्सव साजरा करण्यासाठी भर दिल्याचे दिसून येत आहे. वाढत्या महागाईची झळ यंदा गणेशोत्सवाची मुर्ती(Ganesh Chaturthi) खरेदी करताना दिसून येणार आहे. रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरीस, शाडू आदि कच्चा मालाच्या साहीत्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे मुर्तीच्या किंमतीमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याने मूर्ती विक्रेत्यांतून तसेच कारागीरातून बोलले जात आहे.

 

Smart News:-

कोल्हापूर: राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर परिणाम होणार नाही


श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे


नॅन्सींच्या दौऱ्याने चीनचा संताप; अमेरिकेसोबत चर्चा स्थगित


उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान


विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली ‘वेळ’


 

Leave a Reply

Your email address will not be published.