प्रशांतच्या रूपाने इचलकरंजी गणेश विसर्जन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची छबी झळकली

राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री (state and chief minister)एकनाथ शिंदे यांची क्रेझ आहे.त्यांनी गणेशोत्सवामध्ये विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि उप मुख्य मंत्री पासून अनेक कलाकारांच्या,उद्योगपतींच्या घरातील गणेशाचे घेतलेले दर्शन यामुळे एकनाथ शिंदे जास्तच चर्चेत आले आहेत.त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री (state and chief minister)एकनाथ शिंदे यांच्या सारखं दिसणारा पुण्यातील आंबेगाव परिसरात राहणारा विजयराज माने हा एक युवक काही दिवसापूर्वी चर्चेत आला होता.आता गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने इचलकरंजी येथील प्रशांत किरण आबाळे हा युवक प्रकाश झोतात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखं हुबेहूब दिसणाऱ्या प्रशांत ने गणेश विसर्जन मिरवणुकीत एकनाथ शिंदे सारखं कपाळावर गंध लावून,डोळ्याला चेष्मा आणि पायात कोल्हापुरी चप्पल घालून पांढरा शुभ्र शर्ट आणि पांढरी पँट परिधान करून सहभाग घेतला होता.

प्रशांत ने शिंदे यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच शिंदे यांच्या स्टाईल मध्ये सर्वांना अभिवादन केले.

हात उंचावून आणि नमस्कार करून अभिवादन करण्याची त्या युवकाची लकब वाखण्या जोगी होती.पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रशांत ने आपल्या घरातील गणपती आणताना एकनाथ शिंदे यांची वेशभूषा परिधान केली होती.

अनंत चतुर्दशीला मित्रांनी आग्रह धरल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वेशभूषा परिधान करून इचलकरंजी येथील शिवतीर्थ ते गावं भाग पर्यंत त्याने मिरवणुकीत सहभाग घेतला आणि लोकांना अभिवादन केले.

त्याच्या सोबत अनेकांनी सेल्फी फोटो काढून घेतले.सोसियल मीडियावर मधूनही त्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.इचलकरंजीचे एकनाथ शिंदे अशीच ओळख त्याची या मिरवणुकीत झाली होती.

हेही वाचा: