कारखाना फोडून दीड लाखाची चोरी

industrial estates

इचलकरंजी: पार्वती औद्योगिक वसाहतीच्या(industrial estates) पिछाडीस बंद असलेल्या यंत्रमाग औद्योगिक संस्थेतून १ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या ५८ इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी संस्थेच्या चेअरमन सौ. किर्तीमालिनी वसंतराव नाईक (वय ४७ रा. सहकारनगर) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पार्वती औद्योगिक वसाहतीच्या(industrial estates) पिछाडीस जयवर्धन यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था असून सौ. किर्तीमालिनी नाईक या चेअरमन आहेत. मागील दीड महिन्यापासून ही संस्था बंदच आहे. हीच संधी साधत चोरट्यांनी संस्थेच्या मागील असलेला लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. तेथे असलेल्या ४८ यंत्रमागाच्या ४८ मोटारी, कांडी मशिनवरील ४ मोटारी व १ कॉम्प्रेसरवरील मोटार चार स्पेअर मोटर व इमरीवरील मोटर व यंत्रमागाचे खराब स्पेअर पार्टस् असा १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २४ एप्रिल ते ९ मे २०२२ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Smart News:-

पोकळ थकबाकी कमी केल्याशिवाय बिले भरणार नाही


शाहरूखच्या नाईट रायडर्सने अबू धाबीमधील फ्रेंचायजी घेतली विकत


या उन्हाळ्यात तुमचं वीज बिल होईल 25-30% कमी! फक्त ‘या’ उपाययोजना करा


‘लँड करा दे भाई’ आलियाची नवी जाहिरात, हसुन पोटात दुखेल


व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे नाजूक होतात आणि केस गळायला लागतात; ‘हे’ 5 पदार्थ दूर करतील कमतरता


 

Leave a Reply

Your email address will not be published.