शहापूर येथे जेसीबी खणीत कोसळला

driver

शहापूर येथील बालाजीनगर मध्ये खणीवरील स्वच्छता करताना खणीत जेसीबीच कोसळल्याची घटना घडली. जेसीबीतील चालक(driver ) आणि अन्य एक असे दोघेही सुदैवाने बचावले शहापूर पोलीस व महानगरपालिकेचे आपत्कालीन पथकाने तब्बल सहा तासानंतर क्रेनच्या साहाय्याने रात्री एक वाजण्याच्या सुमारास खणीतून जेसीबी बाहेर काढला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

शहापूर भागात तीन मोठ्या खाणी आहेत लोकवस्ती शेजारी असणाऱ्या बालाजीनगर येथील खण परिसरात बुधवारी दिवसभर जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. जेसीबी मागे पुढे घेत असताना जेसीबी यंत्र खणीत कोसळले. जेसीबीतील चालक(driver ) आणि अन्य एकजण असे दोघे ही खणीच्या पाण्यात बुडाले. अपघाताने मोठा आवाज झाला नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली चालकासह दोघाना वेळीच पाण्याबाहेर काढले.जेसीबी बाहेर काढण्यासाठी 4 क्रेन आणण्यात आल्या विजेची सोय नसल्याने अडचणी आल्या. मात्र महत्प्रयासाने जेसीबी खणी बाहेर काढण्यात आला.

Smart News:-