शरद इन्स्टिट्युटमध्ये 22 जानेवारीला जॉब फेअर

यड्राव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, कोल्हापूर आणि शरद इनिस्टट्यूट(institute) ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव (इचलकरंजी) व राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार (ता.22) रोजी रोजगार मेळाव्याचे (जॉब फेअर) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यासह स्थानिक कंपन्याही सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) व एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी दिली.

जॉब फेअरमध्ये इंजिनिअरिंग(institute), प्रोडक्शन उद्योग, सॉफ्टवेअर कंपनी, बँकींग, इंश्युरन्स, टेलिकॉम, बांधकाम, मेडिकल यासह विविध क्षेत्रातील कंपन्या येणार आहेत. त्यामुळे सातवी ते दहावी, बारावी, आयटीआय, सर्व शाखेतील (आर्टस, कॉमर्स, सायन्स, अभियांत्रिकी, मेडीकल, कृषी, व्यवस्थापन) पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे.

शरद इन्स्टिट्यूटकडून गेल्या 14 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासोबत नोकरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हजारो विद्यार्थी आज देशभरांसह परदेशात नोकरी करीत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग सुरु केले असून त्यामधून रोजगार उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांनी रोजगार मेळाव्यात येताना आवश्यक कागदपत्रे घेवून यावे. तसेच आपल्याला कोणत्या क्षेत्रात नोकरीची आवश्यकता आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे सोबत आणावित.तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScDevA4VpdVnjGwyHCBBtViAl0lm9E_87-bh7_R6ck_kwFA0A/viewform  या लिंकवर नोंदणी कराण्याचे अहवान संस्थेकडून करण्यात आले आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक मुला-मुलीच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने ह्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामधून नामांकित कंपन्याव्दारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात करिअर करणा- या विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे.
अनिल बागणे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर.

हेही वाचा :