इचलकरंजीत काँग्रेसचे जोडेमारो आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारींच्या यांच्या प्रतिमेच्या फलकास इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने जोडोमारो आंदोलन (movement) करण्यात आले.आज के.एल मलाबादे चौकात हे आंदोलन झाले.

कार्यकर्त्यांनी कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद खुडे यांनी (movement) निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात राज्यपाल झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त विधाने करून छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न करतात.ही बाब राज्यपाल पदास शोभणारी नसुन भाजपच्या पाठिंब्यानेच ते अशी सामाजिक शांतता बिघडवणारी विधाने करतात.त्यामुळे भगतसिंग कोश्यारींचे महाराष्ट्रातुन केंद्र शासनाने उचलबांगडी करावी.तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे आपल्या मनोगतात म्हटले आहे.

यावेळी शशिकांत देसाई, डॉ.खिलारे, रविराज पाटील,हारुण खलिफा, दिलीप पाटील,भुषण शहा, किशोर जोशी, प्रविण फगरे, शैलेंद्र गजरे, समीर शिरगांवे,सचिन साठे, प्रमोद नेजे,रवि वासुदेव,ओंकार आवळकर,तोसीफ लाटकर, राजु किणेकर, दिलीप भोई, प्रशांत लोले, चंद्रकांत मिस्त्री, ईम्तीयाज कुडचे, अनिल होगाडे, , बिस्मिल्ला गैबान, सावित्री महापुरे, हसीना जमादार, अस्मिता देवाडिका,अब्साना मुल्ला,रजिया जमादार व शबाना मोबीन यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: