कोल्हापूर: राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर परिणाम होणार नाही

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील
राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर(cooperation) कोणताही परिणाम होणार नाही, एका चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात नागरिक गेले आहेत. त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्याचा टोला सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यात सत्तांतर होताच त्याचे परिणाम कोल्हापूर जिल्हा बँक तसेच गोकुळवरही होतील, असा दावा केला आहे. यावर आता चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनीही आज खासदार महाडिक यांचा समाचार घेतला. राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर (cooperation) कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान जिल्हा परिषदेची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरही, आमदार सतेज पाटील यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सरकारला जनतेची सहानुभूती नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे सर्व षडयंत्र सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. राज्यात शिंदे सरकारकडून कासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरु असून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी दिलेला निधी देखील रोखला गेला आहे. यावरूनही आमदार पाटील यांनी अशा प्रकारे निधी रोखणे योग्य नसल्याचे सांगीतले. याबाबत दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटल्याचेही त्यांनी सांगितले. तर राज्याच्या विकासासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Smart News:-
श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे
नॅन्सींच्या दौऱ्याने चीनचा संताप; अमेरिकेसोबत चर्चा स्थगित
उपराष्ट्रपतिपद निवडणूकीसाठी आज मतदान
विस्ताराअभावी मंत्र्यांचे अधिकार दिले सचिवांना; मुख्यमंत्र्यांवर आली ‘वेळ’
बेटी बचाओ : जाहिरातींवरील खर्चाचा फेरविचार करावा