महा पालिकेच्या निवडणुकीत भाजपा- आवाडे गट एकत्र येण्याचे मंत्री पाटील यांनी दिले संकेत

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा

इचलकरंजी भाजपाला (latest political news)महानगरपालिकेच्या अगोदर मोठा निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल असे सांगत आमदार आवाडे यांना सोबत घेवून महा नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचे संकेत आज वस्त्र उद्योग आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.

मंत्री पाटील यांनी आज भाजपा (latest political news)कार्यालयास भेट देऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. मंत्री पाटील म्हणाले,आगामी काळात इचलकरंजी महा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे.त्यासाठी पक्ष सज्ज आहे.परंतु इचलकरंजी महा पालिकेच्या निवडणूकी आगोदर वरिष्ठ पातळीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. तो निर्णय इचलकरंजीतील कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल आणि पक्ष सांगेल तसे काम करावे लागेल.

पक्षांमध्ये ज्या व्यक्तीवर अन्याय होतो त्या व्यक्तीला नंतर मोठे पद मिळते. परंतु जे निर्णय मान्य करीत नाहीत. ते दूर फेकले जातात ते तुम्हाला माहीत आहे.असे सांगून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी काळात इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी हे एकत्र येण्याचे संकेत दिले.त्यामुळे आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष लागले आहे.

यावेळी अजित मामा जाधव,शहर अध्यक्ष अनिल डाळ्या,मनोज साळुंखे,मनोज हिंगमिरे,सुनील महाजन,दीपक राशीनकर, मिश्रीलाल जाजु आदी उपस्थित होते.

हेही वाचा :