इचलकरंजीत विद्यार्थी उतरले रस्त्यावर वाचा नेमकं प्रकरण काय?

सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आधारवड असलेल्या येथील रवींद्रनाथ टागोर वाचनालयाची (library) अचानकपणे फी वाढवल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. वार्षिक पन्नास रुपये असणारी फी 500 रुपयांवर केल्याने विद्यार्थी सकाळी वाचनालयात गेलेच नाहीत. फी वाढीचा फलक घेवून शेकडो विद्यार्थ्यानी विकली मार्केट येथील मुख्य मार्गवार रिंगण साखळी करत रस्ता रोको केला.
गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिचे विकली मार्केट नजीक रवींद्रनाथ टागोर वाचनालय (library) आहे,. हे वाचनालयातील अभ्यासिकेत शहर व परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थी अभ्यास करतात. स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय मोठे आधारवड आहे. रात्रीच्या वेळी काम करून सर्वसामान्य विद्यार्थी या वाचनालयात जावून अभ्यास करता.
आज अचानकपणे वार्षिक पन्नास रुपये असणारी फी पाचशे रुपये केली. वाढलेल्या फी वरून संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी फी वाढीचा फलक हातात घेतला. आणि विकली मार्केट नजीक मुख्य मार्गावर रास्ता रोको केला. आहे. कर्नाटक राज्यत जाणाऱ्या या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
हेही वाचा :