इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस पथकाला मिळाले मोठे यश

local news

local news – शिवाजीनगर पोलीस ठाणेस वरद विनायक मंदिर, नदीवेस इचलकरंजी येथून नदीमध्ये पोहणेसाठी आलेल्या इसमांचे मोबाईल फोन चोरीस गेलेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच गुरु टॉकीज येथून एक मोबाईल चोरीस गेलेबाबत पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करणेत आला होता.

सदर गुन्हयातील चोरीस गेलेले मोबाईल फोनची तांत्रिक माहिती घेवून तपास सुरु होता. यातील गुरु टॉकीज येथून चोरीस गेलेला मोबाईल फोन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनिल अशोक पांडव वय २३, रा. चांभार गल्ली, हातकणंगले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यानेच चोरी केला असलेची गोपनीय बातमी मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी गुरु टॉकीज येथे सापळा कारवाईचे आयोजन करुन सदर आरोपी सुनिल पांडव यास ताबेत घेतले.

सदर आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा केला असलेची कबूली दिली असून आरोपीकडून गुन्हयातील ७,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत केला आहे. आरोपी सुनिल पांडव हा हातकणंगले येथील खुनाच्या गुन्हयातून जामीनमुक्त झालेला आहे.

यातील वरद विनायक मंदिर येथे चोरीस गेलेल्या मोबाईल चोरीचा तपास सुरु असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना एक इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करणेसाठी येणार आहे अशी गोपनीय खात्रीशीर बातमी मिळालेने पो नि वाघमोडे यांचे आदेशाने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सापळा कारवाईचे आयोजन करुन आरोपी नामे उदय श्रीकांत माने वय २७, रा. वेघर वसाहत, यड्राव, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर यास ताबेत घेवून त्याचेकडून वरद विनायक मंदिर इचलकरंजी येथून चोरी केलेले मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकूण ७५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाईत दोन आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आलेले असून एकुण ८२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. (local news)

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड मॅडम सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक महादेव बाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक सागर चौगले, पो.अं. सतिश कुंभार, विजय माळवदे, पवन गुरव, सुनिल बाईत, अरविंद माने, गजानन बरगाले, प्रविण कांबळे, अमित कांबळे यांनी केली आहे.


हेही वाचा :


डिप्रेशनमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने जपला ‘हा’ मंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *