इचलकरंजी : कोरोचीत शेतामध्ये आढळला अनोळखी मृतदेह

हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे कुंथीनाथ सांगले आज (दि. २७) शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये अनोळखी पुरुषाचा(men)मृतदेह आढळून आला. तारदाळ मार्गावरील कोरोची हद्दीत सांगले हे शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असता हा मृतदेह आढळून त्यांना आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सावकार हेगडे यांना माहिती दिली.
यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह (men)सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटलेली नसून सदर पुरुषाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी अनोळखी मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
हेही वाचा: