इचलकरंजी: मोटरसायकल धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

motorcycle

इचलकरंजी: (प्रतिनिधी) मोटर सायकलच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला. दत्तात्रय दिगंबर फासे (वय 65, रा. शिंदे मळा, खोतवाडी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात इचलकरंजी- सांगली रस्त्यावर अभय दूध डेअरीसमोर घडला. या अपघाताची फिर्याद अनिकेत दत्तात्रय फासे याने गावभाग पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अपघात प्रकरणी मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.(motorcycle )

फिर्यादी अनिकेत फासे यांचे वडील दत्तात्रय फासे हे यंत्रमाग कामगार आहेत. इचलकरंजी सांगली रस्त्यावर रविवारी दु. 3.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल राज कॅसलनजीक असलेल्या लक्ष्मी हॉटेल येथे चहा पिऊन कामावर परत जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडताना अब्दूललाटहून सांगलीकडे जाणार्‍या गिरीष माळगे या मोटारसायकल स्वाराने त्यांना जोराची धडक दिली.(motorcycle )

यामध्ये फासे गंभीर जखमी झाले. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सायंकाळच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी गिरीष वसंत माळगे (रा. अब्दूललाट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स.पो.नि. गाडवे हे करीत आहेत.

 

Smart News:-