महापूराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज: डॉ. प्रदीप ठेंगल

कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या(flood) पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिले होते.

याच अनुषंगाने आज बुधवारी नवीन यांत्रिक बोटीचे उद्घाटन डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इचलकरंजी नगरपरिषद आपत्कालीन विभागामार्फत पंचगंगा नदी घाट येथे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिका सह दिली. यामध्ये यांत्रिक बोट, साधी फायबर बोट, स्टिल कटर, वुड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर, टॉर्च, स्लायडिंग शिडी, बायनाक्युलर ईत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका, हायड्रोलिक प्लॅटफार्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर याचा समावेश आहे.

यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी घेवून महापुराची(flood) परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे अचूक नियोजन करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, वाहन अधिक्षक राजेंद्र मिरगे, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, राजश्री कोरगावकर, सुभाष आवळे, सहजीवन मुक्ती सेवा संस्था इचलकरंजीचे सदस्य, तेजोनिधी रेस्क्यू फोर्सचे सदस्य, वीर रेस्क्यू फोर्सचे रुपेश खरवार, वरद विनायक बोट क्लबचे डॉ. विजय माळी यांच्यासह महापुराच्या(flood) काळात नगरपरिषदेस अत्यंत महत्त्वपूर्ण असे सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे, प्राणी मित्र उपस्थित होते.

Smart News:-

ठाकरे सरकार मोठा निर्णय; सामाजिक आंदोलनातील खटले मागे


बिहारमधील आमदार अनंत सिंह यांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा


“देवेंद्रजी मुख्यमंत्री अन् एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचं सरकार”; भाजपचे साईचरणी साकडे


दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा धावणार ‘चेन्नई-नगरसोल’ रेल्वे


उद्धव ठाकरे म्हणतात, मी आजच मुख्यमंत्रिपद सोडायला तयार, पण….


 

Leave a Reply

Your email address will not be published.