कोल्हापूर जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री नाम.केसरकर आज इचलकरंजीत

Guardian Minister

इचलकरंजी:  राज्यात एकनाथ शिंदे शिवसेना- भाजपाची सत्ता  आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा, तालुका स्तरावर – शिवसेनेची संपर्क यात्रा सुरू झाली आहे. या अंतर्गत उद्या रविवार ता. २५ रोजी राज्याचे शालेय शिक्षण व पर्यावरण मंत्री तसेच जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री(Guardian Minister) दिपक केसरकर हे पहिल्यांदाच इचलकरंजी शहरात येत आहेत. त्यानिमित्त गावभाग परिसरातील मातोश्री कार्यालय येथे सकाळी ११ वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

सदर बैठकीला खास. धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षिरसागर, माजी राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री(Guardian Minister) पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नाम. केसरकर येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तरी या पदाधिकारी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे कोल्हापूर जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Smart News:-