ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरीश बोहरा यांचे निधन!

अल्प कालावधीतच सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक अशा क्षेत्रात कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे ना. बा . एज्युकेशन सोसायटीचे (education society) चेअरमन , स्वदेशी ग्रुपचे उद्योगपती हरीश श्रीनिवास बोहरा ( वय ३८ ) यांचे काल (शनिवार) निधन झाले .
शहरातील (Ichalkaranji) जुने उद्योगपती कै. मदनलाल बोहरा यांच्या कार्याचा वारसा ते पुढे चालवीत होते .

शहरातील विविध शैक्षणिक , सामाजिक व सहकारी संस्थेंशी निगडित होते . ना . बा . एज्युकेशन सोसायटीचे (education society) ते विश्वस्त व सध्या चेअरमन म्हणून काम पाहत होते .  अनेक सहकारी संस्था , धार्मिक संस्थांवर ते विश्वस्त म्हणून काम करीत होते . आपल्या मितभाषी स्वभावाने त्यांनी सर्व क्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली होती .

गेले काही महिने ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली  . त्यांच्यापश्चात आई , वडील , पत्नी , दोन मुले , भाऊ , बहिण असा परिवार आहे . हरीश यांच्या निधनाने  वस्त्रनगरी   इचलकरंजीवर शोककळा पसरली आहे .

हेही वाचा :


कोल्‍हापूर : साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून!

Leave a Reply

Your email address will not be published.