हातकणंगले तालुक्यातील सहा गावातील नागरिकांचा इचलकरंजीत मोर्चा

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील दलित भूमीहीन शेतमजूरांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवू नये ,अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेतून वगळून नियमीतीकरणाचे आदेश द्यावेत. यासह अन्य मागण्यांसाठी आज दलित समाज विकास परिषदेच्यावतीने येथील प्रांत कार्यालयावर (Province Office) मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलकांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात गायरान जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडणार आहेत त्यामुळे सर्वत्र अतिक्रमण काढण्यास विरोध होत आहे याच पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील तारदाळ, तिळवणी, जैनापूर, निमशिरगाव, उमळवाड, कुंभोज आदींसह अन्य गावातील नागरीकानी दलित समाज विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली प्रांतकार्यालयावर (Province Office) मोर्चा काढला, व अतिक्रमण काढू नये अशी मागणी केली .

सर्व्वोच न्यायालयानेही गायरान जमिन अपवादात्मक परिस्थितीत भूमिहीन शेतमजुन अनुसुचित जाती, जमातीच्या व्यक्तींना देणे अनुज्ञेय असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्या अतिक्रमण नियमीतीकरणासही मान्यता दिली आहे. नियमीतीकरणाचे आदेश ही द्यावेत अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली

आंदोलनात गंगाधर चौगुलेमनोहर नलवडे योसेफ आवळे, रविंद्र तिवडे, सचिन साठे, , अदिनाथ तिवडे, , सुनिल कांबळे, अजय सदामते आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा: