बाप रे, इतक्या व्यक्तींनी मिरवणुकीत घेतला पोह्यांचा लाभ!

इचलकरंजीत गणेश विसर्जन मिरवणुकीत इचलकरंजी फेस्टिवल च्या वतीने गणेश भक्तांना नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.2200 किलो पोह्याचा 60,हजार गणेश भक्तांनी लाभ घेतला. सुमारे अकरा तास पोहे वितरण करण्याचे कार्य सुरू होते.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष आबावृध्द मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. अशा व्यक्तींना एक आधार मिळावा,चांगला नाष्टा मिळावा यासाठी गणेश विसर्जन मिरवणूकित आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या सहकार्याने ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे,बाळासाहेब कलागते,अहमद मुजावर,सौ मौसमी आवाडे,शेखर शहा,राहुल गाट,आदित्य आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गाट आणि त्यांच्या टीम ने इचलकरंजी फेस्टिवल च्या माध्यमातून नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी 5 ते रात्री सव्वा तीन वाजेपर्यंत 2200 किलो पोह्याचे वाटप करण्यात आले. सुमारे 60 हजार गणेश भक्तांनी या पोह्याचा लाभ घेतला. 20 आचारी 25 महिलांनी अकरा तास पोहे बनवण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सौ.गंगामाई हायस्कूल मध्ये केले. नाष्ट्याचे वितरण राजवाडा चौकात उभारलेल्या स्टॉलच्या माध्यमातून 50 कार्यकर्त्यांनी केले.या उपक्रमाचा आधार अनेक व्यक्तींना झाला.या नियोजन बद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा :