इचलकरंजी: गावभागात वीजेचा लंपडाव

Power outage

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

इचलकरंजी: आवाडे सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गावभाग परिसरात वीजेचा लंपडाव सुरू आहे(Power outage). त्यामुळे उद्योजकांबरोबर नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सदर परिसरातील नागरिक तसेच उद्योजकांनी दिला आहे.

इचलकरंजी शहर हे उद्योगनगरी म्हणून सर्वपरिचित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिलापोटी सर्वाधिक महसूल मिळवून देणारे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. शहरातील यंत्रमागधारकांसह इतर उद्योजक तसेच घरगुती बिल वेळेवर भरत असतात. मात्र महावितरणच्या अधिकारी वर्गाचे या शहराकडे म्हणावे तसे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. लक्ष्मीदड्ड परिसरात असलेल्या आवाडे सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला असून त्यामुळे गावभाग परिसरासह इतर भागात वारंवार वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत करत असल्यामुळे त्याचा फटका उद्योजकाला बसत आहे(Power outage).

याबाबत वीज वितरणच्या कार्यालात दुरध्वनी केला अस कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी दूरध्वनी उचलत नाहीत. महावितरणच्या या आंधळ्या कारभारामुळे उद्योजकांतून त्याचबरोबर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तेव्हा वीज पुरवठा(Power outage) सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होवू लागली आहे.

Smart News:-

इचलकरंजी-हपरी मार्ग बंद


कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार? वॉर्ड क्रमांक 24 चं गणित काय सांगतं?


राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन


देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ


ऑगस्टमध्ये कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक!