इचलकरंजी परिसरात पावसाची हजेरी

rain

शेतकरी वर्गातून समाधान; बाजारात विक्रेत्यांची धावपळ

इचलकरंजी: शहर व परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी पावसाने(rain) दमदार हजेरी लावली. सुमारे दोन ते अडीच तास पडलेल्या पावसाने सर्वत्र गारेगार वातावरण निर्माण झाले होते. आठवडा बाजारातील फळभाजी विक्रेते, व्यापारी वर्गाची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती. पावसामुळे दिवसभर हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता.

परिणामी उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला तर शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये धडकलेल्या असनी चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता.

शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे सकाळी महाविद्यालयास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामावर जाणाऱ्यांना नागरिकांचा काही काळ खोळंबा झाला. त्याचबरोबर शुक्रवारचा आठवडा बाजार असल्याने सांगली रोडवरील वडगाव बाजार तसेच विकली मार्केटमधील बाजारावर याचा परिणाम झाला. पावसामुळे फळभाजी विक्रेते, व्यापारी वर्गाला आडोसा शोधावा लागला. पावसामुळे(rain) ग्राहकांनी सकाळी बाजाराकडे पाठ फिरवल्याने तुरळक

गर्दी दिसत होती. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तर काही ठिकाणी कचऱ्यामुळे गटारी तुंबल्याचे दिसून आले. दोन तास झालेला पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी चांगला असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात होते. सकाळी पाऊस झाला तरी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे त्याचबरोबर हवेत गारवा निर्माण झाला होता. बदलत्या वातावरणामुळे थंडताप, सर्दीचे रूग्ण वाढताना दिसत आहेत.

 

Smart News:-

….म्हणून आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या पुरुषांची महिलांना पडते भुरळ, जोडीदार म्हणून पसंती!


राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ तरीही मनसे नाराज; काय आहे कारण?


चिंब भिजण्यास तयार रहा! मान्सून… कमिंग सून; सहा दिवस आधीच राज्यात दाखल होणार


पैसे नसल्याने बेघर झालेला तरुण; अचानक जुन्या बँक अकाऊंटबद्दल समजलं अन् आयुष्यच बदललं


कोणत्या अभिनेत्रीमुळे ‘सोहेल – सीमाच्या’ संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी


 

Leave a Reply

Your email address will not be published.