इचलकरंजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृती अभियान

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा: इचलकरंजी शहर वाहतूक शाखा,इचलकरंजी पोलीस दल आणि डी.के. टी. ई इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती अभियान राबविण्यात आले(Traffic awareness). विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

शहर वाहतूक शाखेच्या वतीने आज शहरातील गांधी पुतळा, शिवतीर्थ, थोरात चौक,कबनूर आदी ठिकाणी डी.के. टी. ई इंटरनॅशनल स्कूल च्या 20 विद्यार्थ्यांच्या मदतीने हातात फलक, हेल्मेट, सिग्नलच्या आकृत्या घेऊन ट्राफिक आणि त्याविषयी घ्यायचे काळजी याविषयी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले(Traffic awareness).

दारू पिऊन गाडी चालवल्यास अपघात कसे होतात. याविषयी प्रबोधन करण्याबरोबरच स्वच्छ भारत विषयी जनजागृती करण्यात आली.विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने काखेला कापडी पिशव्या अडकवून विविध गाण्यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.ही मोहीम सहाय्यक निरीक्षक विकास अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी, गावा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पीएसआय तेजस्वी पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Smart News:-