आरके नगर ते शहापुर स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता अखेर पूर्ण 

Cemetery

आरके नगर ते शहापुर स्मशानभूमी पर्यंतचा ३० ते ३५ वर्षापासून संपादीत असलेला रस्ता अखेर पूर्ण

इचलकरंजी: शहापूर प्रभाग क्रमांक २ मध्ये शहापूर आरके नगर ते शहापूर स्मशानभूमी(Cemetery) पर्यंतचा रस्ता गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित होता. सदरच्या ८० फूट रस्त्याचे संपादन ही नगरपालिकेने केले आहे. तेथील शेतकऱ्यांचे पैसे ही भागवले आहेत. परंतु सदरच्या महत्त्वाच्या रस्त्याला कामाचा काही मुहूर्त सापडत नव्हता. पण अखेर तो मुहूर्त सापडला सदरचा रस्ता मंजूर करून मदन कारंडे व उदयसिंग पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

सदरच्या ८० फूट रस्त्यामुळे शहापूर पासून यड्राव सूतगिरणी पर्यंत वाहनधारक जाऊ शकतात, ताण कमी होऊन वाहतुकीस सुलभता येईल असे मदन कारंडे यांनी सांगितले. याप्रसंगी उदयसिंग पाटील म्हणाले, सदरचे काम माझ्या प्रभाग क्रमांक २ मधील असून ते पूर्ण करायचे समाधान मला आहे. ते तसेच एक मोठी समस्या दूर होऊन चांगला निर्णय झाला. याकामी मदन कारंडे, सुरेशराव हाळवणकर मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगरअभियंता बागडे, सांगोलकर, इंजिनिअर बैले यांची मदत झाल्याचेही उदयसिंग पाटील यांनी सांगितले(Cemetery).

सदर शुभारंभ प्रसंगी रणजित अनुसे, राजू लोखंडे, अरुण केसरे, सतीश पंडित, कृष्णात सातपुते, मेजर भोसले, राजू निर्मळ, फिरोज जंगले, शरद चव्हाण, सातपुते मामा, रमेश पाटील, मिटके भाऊजी, वसंत शिंगटे, पवार मामा, अमर चौधरी, बाजीराव गडकरी यांच्यासह सुतार वहिनी, भोसले वहिनी, जाधव वहिनी, चव्हाण काकी यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदरच्या झालेल्या कामामुळे भागातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व समाधान व्यक्त करण्यात आले.

Smart News:-

मान्सून वेळेआधीच दाखल; राज्यात १० जूनपर्यंत येणार


आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!


BCCI ने Guinness Book मध्ये नोंदवलं जाईल असा पराक्रम केला


पंजाबी विद्यार्थ्यांची कोल्हापूर दर्शनानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया…


आरोग्य उत्तम राखण्यासाठी सकाळच्या नाष्ट्यात ‘या’ गोष्टीचा करा समावेश; होईल फायदा, जाणून घ्या


 

Leave a Reply

Your email address will not be published.