भिंत अंगावर कोसळून रूईच्या इसमाचा मृत्यू

wall

इचलकरंजी: भिंत(wall) अंगावर कोसळून शिवाजी बिराप्पा पुजारी (वर ४५, रा. सहारानगर, रुई) या इसमाचा दुदैवी मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भोनेमाळमध्ये घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

शिवाजी पुजारी व त्यांचा मुलगा सागर पुजारी हे दोघे ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करतात. भोने माळ येथे मांढरेकर नामक व्यक्तीचे घर पाडण्याचे काम मक्तेदार कबनूरे यांनी घेतले आहे. त्या ठिकाणी शिवाजी हे भिंत(wall) उतरण्याचे काम करत असताना त्यांच्या अंगावर सुमारे ८ फुटांची भिंत कोसळली. हे पाहून सागर याने आरडाओरडा करत त्यांच्या अंगावरील दगड, विटा, माती बाजुला करून बाहेर काढले. मात्र ते बेशुद्ध अवस्थेत असल्याने आयजीएम रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे.

wall

याबाबतची वर्दी सागर पुजारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोहेकॉ पाथरवट हे करत आहेत.

Smart News:-

वस्त्रनगरीची ओळख पुन्हा ‘क्राईमनगरी’कडे


NEET PG निकाल 2022 nbe.edu.in वर घोषित…


फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या ‘या’ स्मार्टफोनचा जलवा


सात जन्माचं नातं अवघ्या 20 दिवसांत तुटलं;


गंभीर आजारानंतरही बाप बनवण्याची हौस! 15 मुलं जन्माला घातली आणि…


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *