सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

burglar

१७ लाखाचे दागिने हस्तगत

इचलकरंजी: घरफोडीतील सोने विक्रीसाठी आलेल्या सराईत चोरट्यास(burglar) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने पकडले. अक्षय रमेश कांबळे (वय २६ रा. राजीव गांधी झोपडपट्टी शांतीनगर) असे त्याचे नांव आहे. दहा दिवसांपूर्वी कापड मार्केटच्या पिछाडीस अयोध्यानगर येथील बंगला फोडल्याची त्याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून ३४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १९० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा १७ लाख २५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहर आणि परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडी प्रकरणांचा तपास सुरु असताना गोपनीय सूत्रांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील महेश खोत व संजय इंगवले यांना कबनूर परिसरात एक व्यक्ती चोरीचे(burglar) दागिने विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कबनूर ते पंचगंगा कारखाना मार्गावर सापळा रचला.

त्याठिकाणी अक्षय कांबळे याला संशयावरुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अयोध्यानगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ३४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १९० ग्रॅम वजनाचे चांदीचे असा १७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक विनायक सपाटे, शेषराज मोरे, पोलिस अंमलदार प्रशांत कांबळे, अनिल पास्ते, ओंकार परब, अर्जुन बंद्रे, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण, अनिल जाधव, राजेंद्र वरडेंकर, रफिक आवळकर यांच्या पथकाने केली.

Smart News:-

इचलकरंजीत चार चेन स्नॅचरना पकडले


IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान;


उष्माघात, निर्जलीकरण आणि अतिसार टाळण्यासाठी प्या बेलाचे सरबत;


HDFC चे 100 ग्राहक झाले अचानक मालामाल, खात्यात आले 13 कोटी


सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज;


 

Leave a Reply

Your email address will not be published.