इचलकरंजी : सावकर मादनाईक यांचा जिल्हा नियोजन समितीचा राजीनामा!

जिल्हा परिषदेचे माजी सभापती, ‘स्वाभिमानी’चे नेते सावकर मादनाईक हे जिल्हा नियोजन समिती (member) सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार आहेत. काल, गुरुवारी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती.

मात्र ते आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे निवडीबाबत यादी पाठवली होती. त्यावरती काल, गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली. त्यामुळे नियोजन समितीचे पद नको असल्याचे पत्र यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तरीही यांची नियुक्तीची घोषणा झाल्याने ते आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.(member)

member

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारकडून कोणतेही पद नको

आपण महाविकास आघाडी मधुन बाहेर पडलो आहोत. महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको. महाविकास आघाडी सर्व निर्णय शेतकरी विरोधी घेत असल्यामुळे या पदाचा राजीनामा आज, शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले

जिल्हा नियोजन समितीवर २० जणांना संधी

जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे यांच्यासह २० जणांची निवड करण्यात आली आहे.

नव्याने निवड झालेले सदस्य असे : नामनिर्देशित सदस्य : आमदार आबिटकर, आमदार पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, एम. एस. देशमुख (कोल्हापूर), संभाजी पवार (रा. लाटवडे, ता. हातकणंगले), शिवसेनेचे बाजीराव पाटील (रा. शिये, ता. करवीर).

विशेष निमंत्रित सदस्य असे : राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे (रा. बालिंगे, ता. करवीर), जयसिंग पाटील (रा. सुळंबी, ता. राधानगरी), माजी उपमहापौर संजय मोहिते ( कोल्हापूर), भगवान जाधव (रुकडी, ता. हातकणंगले), भारत पाटील (भुये, ता. करवीर), प्रेमला पाटील (कोरोची, ता. हातकणंगले), सर्जेराव शिंदे (दानोळी, ता. शिरोळ), माजी आमदार संपतराव पवार- पाटील यांचा मुलगा क्रांतिसिंह पवार- पाटील (सडोली खालसा, ता. करवीर), माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे (कोल्हापूर), सचिन ऊर्फ युवराज पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर), मोहन धुंदरे ( राशिवडे, ता. राधानगरी), तानाजी आंग्रे (वरणगे, ता. करवीर), पोपट दांगट.

हेही वाचा :


कोल्हापूर : व्यावसायिकावर चाकूहल्ला; हल्लेखोरास नागरिकांचा चोप!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *