इचलकरंजी मध्ये शाहू महोत्सव मोठ्या उत्साहात

इचलकरंजी:- येथील लोकराजा शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट,इचलकरंजी यांच्या वतीने घोरपडे नाट्यगृह येथे शाहू (festival) महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाट्न माजी आमदार राजीव आवळे, adv सचिन माने, जेष्ठ उद्योजक रामस्वरूप पुरोहित, माजी बांधकाम सभापती राजाभाऊ कांबळे,समाजिक कार्यकर्ते नितीन लायकर, माजी उपसभापती अविनाश कांबळे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी शाहू महोत्सवाचे संकल्पक प्रमुख अरुण रंजना कांबळे म्हणाले की,गेली आठ वर्षे झाली छ.शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणी वारसा आम्ही शाहू महोत्सवाच्या (festival) माध्यमातून जपत आहोत.शाहू महोत्सव मध्ये अनेक प्रकारचे संस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम घेऊन आम्ही यद्वारे शाहू महाराजांना एक आगळी वेगळी आदरांजली वाहत असतो.शाहू महाराजांचा विचार कलेच्या माध्यमातून जनमाणसात पोहचण्या साठी शासना तर्फे इचलकरंजी शहरामध्ये शाहू महाराज यांच्या नावे शाहू कला दालन निर्माण व्हावे यासाठी आम्ही लढा देणार आहोत.
असे प्रतिपादन शाहू महोत्सवाचे प्रमुख अरुण रंजना कांबळे यांनी केले.
सदरचा महोत्सव हा दिवसभरात तीन सत्रात आयोजित करण्यात आला होता.
तसेच खास आकर्षण म्हणून जाणू विना रंगच नाय फेम सुप्रसिद्ध गायिका राणी म्हस्के उपस्थित होत्या.
पहिल्या सत्रामध्ये डान्स इचलकरंजी डान्स महाअंतिम फेरी लहान – मोठा गट
दुसऱ्या सत्रात इचलकरंजी आयडॉल गायन स्पर्धा महाअंतिम फेरी लहान- मोठा गट
तिसऱ्या सत्रात मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार वितरण सोहळा आणि बक्षीस वितरण सोहळा
असा हा शाहू महोत्सव सकाळी 10 वाजले पासून ते रात्रौ 12 वाजेपर्यंत घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निकम (नाशिक) यांनी स्वीकारले होते.
विशेष प्रेषक अतिथीचा मान पल्लवी सुतार,सना महात,सुभाष टाकळीकर, यांना देण्यात आला.
सेक्रेटरी अक्षरा अरुण कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन आणि आभार स्वप्नील गोरंबेकर यांनी मानले.
सदर महोत्सव यशस्वी होण्यासाठी ओंकार सर,अभिजित जांभळीकर,प्रज्ञा मॅडम, प्रथमेश सर, निखिल सर,प्रशिक सर, आदित्य सर,दिक्षा मॅडम, पायल मॅडम, श्रवरी मॅडम,रविना शिंदे,शिवम चौगुले, अमीर गवंडी आदिनी परिश्रम घेतले.
हेही वाचा :
- लष्करात थेट अधिकारी पदासाठी नोकरीची संधी
- सुषमा अंधारे यांच्यापाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी; फेसबुक पोस्ट चर्चेत