शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटात इचलकरंजीचा आवाज घुमणार

स्मार्ट इचलकरंजी | वृत्तसेवा विशेष वृत्त

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरूडझेप चित्रपट प्रदर्शित (displayed) होत आहे.त्या पार्श्भूमीवर खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि चित्रपट विष्यी माहिती दिली. तसेच दिल्ली येथे ‘गरूडझेप’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी वेळ देण्याची विनंती केली.

त्या पार्शवभूमीवर हा चित्रपट प्रकाश झोतात आला आहे.(displayed) ज्या घटनेने ३५६ वर्षांपूर्वी देशाचे लक्ष वेधून घेत या मातीला स्वाभिमानाची शिकवण दिली, त्या ऐतिहासिक घटनेवर शिवप्रताप गरूडझेप हा सिनेमा आधारित आहे.

displayed

या चित्रपटात इचलकरंजीत सुपुत्र राजू नदाफ यांनी शेर आ गया हे कव्वाली सेरुपत गाणे मनीष राजगिरे यांच्या सोबत म्हंटले आहे.मुंबईतील नामांकित यश राज स्टुडिओ आणि कोल्हापुरातील राधाई स्टुडिओ मध्ये त्या गाण्याचे ध्वनी मुद्रण करण्यात आले आहे.शशांक पवार यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. फुयुजन प्रकारात असलेल्या या गाण्यामुळे चित्रपट आणखी रंगत येते. राजु नदाफ यांचे कुटुंब संगीत क्षेत्रात आहे.राजु हा पूर्वी सन 2019 मध्ये सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात उप विजेता ठरला होता.

displayed

तर सन 2021 झालेल्या सारे गामा पा या झी टिव्ही वरील कार्यक्रमात त्याची पहिल्या दहा स्पर्धकात निवड झाली होती.राजू नदाफ चे हे चित्रपटातील पहिलेच गाणे आहे.त्याने या पूर्वी गणपती तसेच इतर गाणी म्हंटली आहेत.राजुच्या आवाजाच्या रूपाने इचलकरंजीचा आवाज शिवप्रताप गरुडझेप चित्रपटात घुमणार आहे.

Smart News :-