इचलकरंजीत 1100 किलो फुलांनी सजले श्री काळा मारुती मंदिर

येथील श्री काळा मारुती (temple) मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. सोमवारी मार्गशिर्ष पंचमी या दिवशी मुख्य दिवशी तब्बल 1100 किलो फुलांनी संपूर्ण मंदिरासह गाभार्‍याची आकर्षक नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती. तर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

सुमारे 200 वर्षापूर्वीचे संस्थान काळातील (temple) मंदिर असून श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या माध्यमातून काळा मारुती मंदिराचे 25 वर्षापूर्वी नुतनीकरण करण्यात आले. त्यानुसार यंदा मंदिराचे रौप्य महोत्सवी वर्ष असून वर्धापनदिनाचे औचित्य 24 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य दिंडी स्पर्धा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उदंड असा प्रतिसाद लाभला. या दिंडी सोहळ्याचे मंदिरात दररोज चित्रीकरण दाखविण्यात येत आहे. त्याचबरोबर भारत देशामध्ये प्रथमच मराठी श्री रामचरित मानस रामायण चा भव्य स्क्रीनद्वारे (डिजिटल) सामुदायिक संगीत पारायण सोहळा होत आहे.

24 नोव्हेंबरपासून दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हभप महादेव चौगुले महाराज (चंदूर) व हभप पूर्णानंद काजवे महाराज (कोगनोळी) यांचे किर्तन सुरु आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश आवाडे, स्थायी अध्यक्ष नंदु उर्फ बाबासो पाटील, उपाध्यक्ष सुभाष तोडकर, सचिव श्रीकांत टेके, किशोर मेटे, दत्तात्रय मेटे, तात्या पुजारी, सागर मुसळे, मिश्रीलाल बजाज, ओमप्रकाश कोठारी, गोविंद सोनी, देवराज जोशी परिश्रम घेत आहेत.

मार्गशिर्ष पंचमी अर्थात 28 नोव्हेंबर हा मंदिर वर्धापन दिनाचा मुख्य दिवस असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही 1100 किलो फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. या कामी परिसरातील 2000 महिला व भक्तांनी फुले ओवण्यासाठी हातभार लावला. 4 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून मंगळवार 6 डिसेंबर रोजी सोहळ्याची सांगता मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाने करण्यात येणार आहे.

हेही वाचा: