गटारीच्या स्वच्छतेकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षगटारीच्या स्वच्छतेकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

Smart News:- वारंवार तक्रार करूनही मरगूबाई मंदिर चौक ते नदीवेस नाका परिसरातील मोठी गटार साफ केली गेली नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देवून गटारीची साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतनू होत आहे.
मरगूबाई मंदिर ते नदीवेस नाका या मुख्य रस्त्यावरील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपपर्यंच्या मोठ्या गटारीची गेली काही दिवसांपासून साफसफाई केली नाही. त्यामुळे या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व इतर कचरा साचला आहे. सदर गटारीचे स्वच्छता करा अशी वारंवार सूचना करून भागातील सफाई कर्मचारी दुर्लक्ष करीत असतात.
त्याबाबत परिसरातील मुकादम व इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळतात असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा तातडीने स्वच्छता करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिला आहे.
Smart News:-
इचलकरंजीत राज्यस्तरीय बालनाट्याला प्रारंभ
आर्थिक वादातून आरटीओ एजंटचा खून
“Virat Kohli फक्त अशाच पिचवर हिरो बनतो जिथे…”; Pakistan च्या माजी खेळाडूने केलं मोठं विधान