इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात मनमानी कारभार, प्रशासनाचे दुर्लक्ष

Smart News:- इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात मनमानी कारभार, प्रशासनाचे दुर्लक्ष

Smart News:- इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे एका अत्यवस्थ रुग्णास बेवारस होण्याची वेळ आली. याची माहिती माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांना मिळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत पोस्ट कार्यालय परिसरातून सदर रुग्णास घेवून पुन्हा वैद्यकीय उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तसेच रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत अधिका-यांससह कर्मचाऱ्यांना चांगलाच जाब विचारुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माणुसकी फौंडेशनने प्रशासनाकडे केली आहे.

इचलकरंजी शहरातील पोस्ट कार्यालय परिसरात काल गुरुवारी सकाळी एक बेवारस इसम अत्यवस्थ अवस्थेत असल्याची माहिती माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानुसार फौंडेशनच्या सदस्यांनी सदर माहितीची खातरजमा करुन घेत त्या इसमास रुग्णवाहिकेतून आयजीएम रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले होते. पण ,आज दुपारच्या सुमारास पुन्हा सदर बेवारस रुग्ण पावसात झोपलेल्या अवस्थेत पोस्ट कार्यालय परिसरात आढळल्याची माहिती फौंडेशनच्या सदस्यांना मिळाली.

त्यानुसार फौंडेशनचे रवी जावळे व त्यांच्या सदस्यांनी सदर ठिकाणी येवून पाहणी केली. यावेळी सदर रुग्ण हा अत्यवस्थ अवस्थेत असून त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांनी पुन्हा रुग्णवाहिकेतून त्याला आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच माणुसकी फौंडेशनच्या सदस्यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा चांगलाच जाब विचारला. तसेच रुग्णालयात भोंगळ कारभार चालत असल्याचा आरोप केला.

यावेळी संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने माणुसकी फौंडेशनचे सदस्य आणखीनच संतप्त बनले. त्यांनी या गंभीर प्रकाराबद्दल कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. दरम्यान, आयजीएम रुग्णालयात कोणतीच शिस्त नसल्याने रुग्णांवर उपचार करताना ब-याच अडचणी उदभवत आहेत. त्यामुळे या भोंगळ कारभाराचा सर्वसामान्य वर्गातील रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून सर्वसामान्य रुग्णांवर चांगले व तातडीने उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 

Smart News:-

कोल्हापूर: मेघालयातील शेतकऱ्यांनी हमीभावाच्या लढाईसाठी मोठा लढा उभा करावा – राजू शेट्टी


UAE चे राष्ट्रपती शेख खलिफांनी घेतला अखेरचा श्वास, जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुख अशी होती ओळख


पाऊस आला ओ…! देशवासियांची गरमीपासून सुटका होणार; लवकरच मान्सून केरळमध्ये धडकणार


’11वीला एका कॉलेजात, 12वीला दुसऱ्या’ आता ही गंडवागंडवीची कामं बंद ! नवा नियम पाळावा लागणार


‘घर पेटवणार नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व’; शिवसेनेचं पुन्हा एक ट्विट, उद्या तोफ धडाडणार!

Leave a Reply

Your email address will not be published.