महासत्ता चौक रुंदीकरणबाबत लवकरच निर्णय

रूग्गे मळ्यातीलही प्रश्न मार्गी लागणार
Smart News:- इचलकरंजी शहरातील राजवाडा चौक ते महानगरपालिका महासत्ता चौक आणि बालाजी पत संस्था ते सांगली रोड या रस्त्यांच्या रुंदीकरण संदर्भात झालेल्या च चर्चेत संबंधित जागा मालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या संदर्भात १ ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील प्रलंबित भूसंपादन प्रश्नी प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी जागा मालकांसमवेत आढावा बैठक घेतली. इचलकरंजी शहराचा विकास होण्यासाठी विविध ठिकाणी भूसंपादन करून रस्ता रुंदीकरणासह नवीन रस्ता करण्याची कामे काही कारणास्तव प्रलंबित आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने राजवाडा चौक ते महासत्ता चौक तसेच बालाजी पत संस्था कार्यालय ते सांगली रोड रस्त्यासाठी रुग्गे मळा याठिकाणचे भूसंपादन करण्याच्या कामांचा समावेश आहे. या अनुषंगाने प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी महासत्ता चौक परिसर आणि रुग्गे कुटुंबातील सदस्य यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत दोन्ही प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान जागामालकांच्या विविध शंकांचे समाधान झाल्याने त्यांनी याप्रश्नी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने १ ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेऊन अंतिम तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नगररचनाकार रणजित कोरे, शहर अभियंता संजय बागडे, रचना सहाय्यक नितिन देसाई, तेजस इंगळे यांचेसह दोन्ही परिसरातील जागांचे मालक उपस्थित होते.
Smart News:-
मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
प्रधानमंत्री आवास योजनेस एकनाथ शिंदे सरकारचा खो
सोलापूर महापालिका निवडणुक, राजकीय परिवर्तनामुळे महापालिकेवर भाजपाची पकड अधिक घट्ट होणार का?
तब्बल 6 लाख आधार कार्डची रद्दी!