इचलकरंजी: प्रशासनाला पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाही, आम.प्रकाश आवाडे यांची टीका

Smart News:- प्रशासनाला पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाही आम.प्रकाश आवाडे यांची टीका

Smart News:- इचलकरंजी थकीत सहाय्यक अनुदानापोटी प्राप्त ९८ कोटीमधून अतिरिक्त शिल्लक रकमेतून कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची उर्वरीत जलवाहिनी बदलासाठी मागणी केली असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. केवळ काहीजणांच्या हस्तक्षेपामुळे हा निधी चांगल्या कामाऐवजी केवळ मक्तेदारांची बिले काढण्यासाठी खर्ची घातला जात असून प्रशासनालाही पाणी प्रश्नाचे काहीच गांभिर्य दिसत नसल्याची टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे.

राज्य शासनाकडून नगरपरिषदेला काही महिन्यांपूर्वी सहाय्यक अनुदानातील थकीत रकमेपोटी ९८ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्या रकमेतून सेवारत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सर्व देयके, मेडीकल बिले, प्रॉव्हिडंड फंडासह देण्यात आली. त्यातूनही बरीचशी रक्कम शिल्लक राहिली. त्यातूनही कर्मचाऱ्यांची उर्वरीत देणी भागविण्यास कोणाचाच विरोध असण्याचे कारण नव्हते, असे सांगत आमदार आवाडे यांनी, त्यानंतर शिल्लक रकमेतून शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न व्हावा या उद्देशाने नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि विद्यमान महापालिकेचे आयुक्त यांना पत्र पाठविले होते. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या उर्वरीत जलवाहिनी बदलासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन द्यावा.

त्यासाठी निधी खर्च करण्याबाबत राज्य शासनाकडून आपण मंजूरी आणून देऊ असे पत्राद्वारे कळविले होते. परंतु प्रशासनाकडून पाणी प्रश्नाला गांभिर्य न देता अन्य गोष्टीत रस असल्याचे दिसते.

शहरासाठीची सुळकूड योजना पूर्णत्वास जाण्यास काही कालावधी लागणार असल्याने कृष्णा योजना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी शिल्लक निधीतून खर्च करण्यास मंजूरीसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करु अशी ग्वाही दिली असतानाही केवळ काही व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे चांगल्या कामाऐवजी निधी आर्थिक हित जोपासण्यासाठी मक्तेदारांची बिले आदा करण्यासाठी खर्च केला जात असल्याचेही आमदार आवाडे यांनी म्हटले आहे.

 

 

Smart News:-

इचलकरंजी: गावभागात वीजेचा लंपडाव


इचलकरंजी-हपरी मार्ग बंद


कोल्हापुरात कुणाचं पारडं जड ठरणार? वॉर्ड क्रमांक 24 चं गणित काय सांगतं?


राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन


देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ