कोरोची येथे श्री बनशंकरी देवी उत्सव उत्साहात

इचलकरंजी – कोरोचीमध्ये हटकर कोष्टी समाजाच्या वतीने प्रथमच शाकंभरी पौर्णिमेनिमित्त (festival ) आयोजित श्री बनशंकरी देवीचे फोटो पूजन व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोरोचीचे सरपंच संतोष भोरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कोरोची समाजाचे संचालक प्रशांत तुरंबेकर यांच्या हस्ते श्री बनशंकरी देवीचे फोटो पूजन व महाआरती झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद सुरू झाला. यासाठी भागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग नोंदवला. स्वागत हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष विजय कडगावे यांनी केले.

यावेळी हटकर कोष्टी समाज महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे, हटकर कोष्टी समाज इचलकरंजीचे अध्यक्ष शिवकांत मेत्री, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इराण्णा सिंहासने, इचलकरंजी युवक मंडळाचे अध्यक्ष अमित खानाज, उद्योगपती सुनिल सांगले, चंदूर अध्यक्ष सचिन हळदे, हेमंत वरुटे, रजनीकांत लठ्ठे, राजू कोन्नूर, विवेक हासबे यांच्यासह इचलकरंजी, वडगाव येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोची समाजाचे सर्व संचालक, तसेच महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या (festival ) पार पाडला.

हेही वाचा :