गुरुकुलच्या मंदार पुजारी याची चिपळूण ( डेरवण ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड

State Level Dodgeball Championship

इचलकरंजी : महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन आयोजित सांगली जिल्हा डॉजबॉल असोसिएशन पुरस्कृत १३ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय डॉजबॉल चॅम्पियनशिप(State Level Dodgeball Championship) स्पर्धा दिनांक 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये बत्तीसशिराळा येथे संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने मुंबई,ठाणे, जालना ,वाशिम ,रत्नागिरी, अमरावती,बीड सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा एकूण 43 जिल्ह्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धे मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या मंदार पुजारी याची चिपळूण डेरवण येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. मंदार पुजारी हा गुरुकुल चा विद्यार्थी असून मंदारला हे यश त्याचा डॉजबॉल मधील नियमित सराव, जिद्द ,चिकाटी व खिलाडीवृत्ती यामुळेच संपादन करता आले (State Level Dodgeball Championship).

मंदारची राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी झालेली निवड हि गुरुकुल साठी उल्लेखनीय बाब आहे. मंदारला गुरुकुलचे क्रीडा शिक्षक श्री सुहास कुलकर्णी व सुनिल चव्हाण यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.तसेच संस्थेचे चेअरमन आदरणीय गणेश नायकुडे सर, व्हाईस चेअरमन सौ.नविता नायकुडे मॅडम,मुख्याध्यापिका यांचे कडून वेळोवेळी मंदारला प्रेरणा मिळत गेली.

 

Smart News:-