पंचगंगेत विसर्जनसंदर्भात मंडळांचे आजी-माजी आमदारांना निवेदन

Panchganga River

इचलकरंजी: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि राज्य शासनाने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर श्री मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटविल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे : विसर्जन हे पंचगंगा नदीमध्येच(Panchganga River) व्हावे या संदर्भात सोमवारी शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदन स्विकारून आम. आवाडे यांनी यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ! निश्चितपणे परवानगी आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनीही या संदर्भात महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संपर्क साधत शासनानेच उत्सवांसाठी परवानगी दिली असल्याने यंदा पंचगंगा नदीत(Panchganga River) विसर्जनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

शिष्टमंडळात बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, शैलेश गोरे, मलकारी लवटे, महावीर कोल्हापूरे, राजेंद्र जोंग, राजेंद्र दरीबे, सागर कम्मे, किशोर पाटील, सचिन माळी, संदीप बेलेकर, सुभाष मोरबाळे, दत्ता सुर्यवंशी, अविनाश कांबळे, सुधाकर कोष्टी आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Smart News:-

इचलकरंजी: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत ध्वज वितरणास प्रारंभ


इचलकरंजी: पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर…


भारतीय खेळाडूंच्या आजच्या सामन्यांची वेळ जाणून घ्या, बॉक्सिंग, कुस्तीकडून मेडल्सची अपेक्षा


जेईई-मेन परीक्षेत 24 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; १३ भाषांमध्ये झाली परीक्षा


अमेरिकेच्या मुंबईतील कॉन्सुल जनरलपदी हँकी; रविवारी स्वीकारला कार्यभार


 

Leave a Reply

Your email address will not be published.