इचलकरंजी: वस्त्रोद्योग वाढीसाठी राज्य सरकार सकारात्मक

textile industry

ना. चंद्रकांत पाटील; ‘यार्न एक्स्पो’चे उद्घाटन; प्रदर्शनामुळे उद्योगाला चालना

इचलकरंजी: राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी राज्यसरकार सकारात्मक आहे. वस्त्रोद्योगातील (textile industry) प्रलंबीत मागण्यासंदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच ‘याने एक्स्पो–२०२२’ सारख्या प्रदर्शनामुळे शहर परिसरातील वस्त्रोद्योग वाढीला आणखी चालना मिळेल. त्याचा लाभ उद्योजकांना होईल असेही प्रतिपादन त्यांनी केले.

इचलकरंजी शटललेस  फ्रें ब्रिक्स मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनच्यावतीने स्टेशन रोडवरील पंचरत्न सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केलेल्या दोन दिवशीय यार्न एक्स्पो २०२२ – प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नाम. पाटील बोलत होते. नाम. पाटील पुढे म्हणाले, वस्त्रोद्योगाच्या (textile industry) प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्यसरकारने काही घोषणा केल्या. काही घोषणाची अंमलबजावणी झाली. आपण यापूर्वी वस्त्रोद्योग विभागाचा मंत्री असताना सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना सवलतीच्या दरात वीज दिली.

त्याप्रमाणे वस्त्रोद्योग (textile industry) वाढीसाठी प्रयत्न करुन असे सांगितले. कापसाच्या वारंवार तेजी-मंदिमुळे त्याचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावर होतो. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच सर्व कापूस खरेदी करुन त्यानंतर राज्यातील सुतगिरण्यांना विक्री केल्यास निश्चित मार्ग निघेल. तसा प्रस्ताव विचारधीन असल्याचे नाम. पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील देशाची लोकसंख्या गृहीत धरुन रोजगार वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये विविध उद्योगाचे

प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सरकारमार्फत उभारण्याचा प्रयत्न आहे, अशाच प्रकारचे प्रशिक्षण केंद्र इचलकरंजीत उभारल्यास सरकार निश्चितच मदत करेल, असेही नाम. पाटील , शेवटी म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर असोशिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी, शहर परिसरात सध्या २० ते २२ हजार शटललेस लूम आहेत. पूर्वी युरोप देशातून सेंकड लूम येत होते. मात्र सध्या परिस्थिती बदलली असून नव – नवीन ॲटोलूम येत असून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्वॉलिटीचे कापड उत्पादन होत आहे.

ॲटोलूमधारकांना बाजारपेठेमध्ये कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी २०१७ साली इचलकरंजी शटललेस फॅब्रीस इचलकरंजी शटललेस फॅब्रीस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची स्थापना केली. वस्त्रोद्योगातील समस्याबाबत शासनाने मदत करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने टफ योजना ऐवजी पीएलआय योजना राबविली आहे. त्यामध्ये मोठ्या उद्योगाप्रमाणे  लहान – लहान उद्योगासाठी चालना देणे आवश्यक आहे. तसेच परदेशात निर्मिती होणारे ॲटोलूम आपल्या देशात तसेच पश्चिम महाराष्ट्रात तयार करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम. प्रकाश आवाडे यांनी यार्न एक्स्पो सारखे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम चांगला आहे. यापूर्वी शहरात दोन वेळा प्रदर्शन भरविले आहे. त्याचा निश्चित लाभ उद्योजकांना झाला. जादा स्पीडच्या ॲटोलूमवर टिकणारे सूत तयार झाले पाहिजे देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर सूत निर्मिती होते. त्यामुळे त्याचा निश्चित फायदा ॲटोलूमधारकांना होतो. वस्त्रोद्योगाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्य सरकार मार्ग  काढेल असेही स्पष्ट केले.

यावेळी ग्रासीम इंडस्ट्रिजचे  मार्केटिंग प्रेसिडेंट मनमोहन सिंग यांनी इचलकरंजी शहर परिसरात १ हजार टन सूत येते एकूण राज्यापैकी केवळ इचलकरंजीत ४ टक्के सूत येते त्यामुळे भविष्यात ग्रासीमचे मुख्य हब इचलकरंजी असेल असे नमूद करीत अत्याधुनिक लूमवर निर्माण होणाऱ्या कापडावर चांगले प्रोसेस युनिट असणे आवश्यक आहे.  त्यासाठी आपली कंपनी सर्वतोपरी मदत करेल.

सुतव्यापारी अरुणकुमार गोयंका यांनी यार्न एक्स्पो प्रदर्शन आणि त्यामध्ये आयोजित केलेल्या विविध मान्यवरांच्या चर्चासत्रामुळे आगामी काळात वस्त्रोद्योग कसा असेल हे स्पष्ट होणार असून वस्त्रोद्योगाचे भवितव्य चांगलेच असल्याचे नमूद केले. शेवटी गोरखनाथ सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास असो. चे व्हा. चेअरमन धवल देसाई, किशोरकुमार मुंदडा, सुनिल सारडा, दिनदयाल झंवर, सचिन झंवर, संजय पाटणी, रविशंकर पांचोरीया, संजू कासलीवाल, कुणाल घोरपडे, सर्वेश बांगड, ब्रिजेश मंत्री, प्रमोद सोमाणी, विजय पुरोहित, महावीर जैन आदी उपस्थित होते.

 

Smart News:-