इचलकरंजी महानगरपालिकेवर पहिला महापौर राष्ट्रवादीचाच

Corporation

इचलकरंजी पक्षनिरीक्षक अविनाश चोथे यांचे प्रतिपादन

इचलकरंजी: गट तट विसरून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी एकजुटीने कार्य करत आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहे याचा फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होईल, त्यामध्ये महानगरपालिकेवर(Municipal Corporation) सत्ता येऊन राष्ट्रवादीचाच महापौर होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी निरीक्षक अविनाश चोथे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इचलकरंजीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून अविनाश दत्तात्रय. चोथे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांनी प्रथमच इचलकरंजी शहरांमध्ये पक्ष कार्यालयास भेट दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि माजी आमदार अशोक जांभळे यांच्यावर नागरिकांचा असणारा विश्वास तसेच त्यांचे आज वरचे असणारे कार्य पाहता महापालिकेचा पहिला महापौर राष्ट्रवादीचा असेल, असे स्पष्ट केले(Municipal Corporation). यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीने कामाला लागले पाहिजे शहराच्या विकासाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यादी कार्यरत होती आणि यापुढेही कार्यरत राहील असे मनोगत यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार अशोक जांभळे, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे, विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील, राजू खोत, मंगेश कांबुरे, अब्राहम आवळे, बाळासाहेब देशमुख, अमरजीत जाधव, तानाजी हराळे, दशरथ माने, नितीन कोकणे, संजय बेडकाळे, अभिजीत रवंदे, माधुरी सातपुते, यासीन मुजावर, बाबासाहेब कोकणे, दिलावर पटेल, ‘, विठ्ठल चौगुले, अण्णासाहेब कागले, राहुल ज्वारे, अमित गाताडे, अमोल भाटले, तसेच इतर प्रमुख मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Smart News:-