डी के टी ई संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या ७ विद्यार्थ्यांची थरमॅक्स लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड

इचलकरंजी येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या (polytechnic) विद्यार्थ्यांची थरमॅक्स लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक च्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील विद्यार्थी रोहन कोळी, अक्षय फरांडे, सारंग मेहेरकर, अक्षता चौगुले, मानसी मेनसंगी, भूषण खोत व प्रसाद हिरेमठ या विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड झाली आहे.थरमॅक्स लि. पुणे ही नामांकित कंपनी २९ आंतरराष्ट्रीय कार्यालयद्वारे देश व विदेशात कार्यरत आहे. ही कंपनी हिटींग, कुलींग, वॉटर अण्ड वेस्ट मॅनेजमेंट तसेच बॉयलर, पॉवर जनरेशन, पॉवर प्लॅंन्टस, इंडस्ट्रीयल अण्ड वेस्ट वॉटर सिस्टीम यांची निर्मिती करते.
या विद्यार्थ्यांची झालेली निवड म्हणजे तांत्रिक शिक्षणातील गुणवत्ता व दर्जा याचा परिपाक आहे. दर्जेदार तंत्र शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा पॉलिटेक्निकने (polytechnic) स्थापनेपासूनच जोपासली असल्याचे मनोगत मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले.येथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असा कुशल अभियंता बनतो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता व्यवस्थापनाने सर्व सुविधा पुरविल्या आहेत स्टाफचे परिश्रम विद्यार्थ्यांची जिद्द आणि त्यास मिळालेली कष्टाची जोड या त्रिसूत्री मुळेच आज वर १००% प्लेसमेंट झाली आहे.विद्यार्थ्यांच्या या निवडीने पॉलिटेक्निकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचे पाॅलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अभिजित कोथळी यांनी नमूद केले.
डी के टी ई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, सर्व संचालक मंडळानचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयुटचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अभिजीत कोथळी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम.बी. चौगुले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल समाज्याच्या सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :