कबनुर ग्रामपंचायतचे नगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग

कबनुर ग्रामपंचायतचे नगरपालिकेमध्ये (municipalities)रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.राज्य शासनाने निवडणूक आयोगाला कबनुर ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी सहमती मागितली आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने 28 जून 2022 च्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका(municipalities) घेण्याचे प्रस्तावित केलेले असून अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही असे कळविले होते. त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्राथमिक उद्घोषणा काढण्यासाठी निवडणूक आयोगाचे सहमती शासनाने मागितली आहे.

तसे 20 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने पत्र दिले आहे. त्यामुळे कबनूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता मंदावली असून नगर परिषदेमध्ये रूपांतर होण्याच्या घडामोडींना वेग आलेला आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठ्या गावामध्ये कबनूर गावाचा समावेश आहे.सध्या या ग्रामपंचायतीवर भाजपाचे सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे. जर नगरपरिषद झाली तर ग्रामपंचायतिची सत्ता किती दिवस राहणार हाही कळीचा मुद्दा आहे.नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.आशा परिस्थितीत सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

कबनूर ग्रामपंचायतचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याला काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे.तर काही गावातील युवकांनी नगरपरिषद करण्यावर आग्रह धरला आहे.यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी ही उडी घेतली आहे.त्यामुळे किती दिवसात नगरपरिषद होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :