इचलकरंजीत मोकाट जनावरांचे लसीकरण सुरू

animals

पाच जनावरांवर उपचार : दोन गायींचा मृत्यू

इचलकरंजी: सध्या शहरात भटक्या जनावरांना(animals ) लम्पी या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होत चालला असून बाधित गायींचे लसीकरण केलेले नसेल व त्या गायीचा मृत्यू झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गाय मालकाची राहील. आणि प्रसंगी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करणेत येईल, अशी माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी दिली. तसेच महापालिका प्रशासनाने भटक्या जनावरांच्या लसीकरणाची  मोहिम हाती घेतली असून गुरुवारी दिवसभरात ३० गायींचे लसीकरण करण्यात आले. तर लम्पीची लागण झालेल्या ५ गायींवर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगितले.

दरम्यान, शहरातील २० भटक्या गायींना लम्पीचा संसर्ग झाला असून त्यापैकी २ भटक्या व गो शाळेतील एका गायीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहरात सुमारे २०० भटक्या गाई असून शहराच्या शांतीनगर, महात्मा गांधी पुतळा, कॉ. मलाबादे चौक, थोरात चौक यासह विविध ठिकाणी या गायी समूहाने फिरतात. शहरातील भटक्या गायींमध्ये लम्पी आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

गायी व गो संवर्ग जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होत त्यातून जनावरे(animals ) मृत होत आहेत. या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली असून ज्या मालकांच्या गायी किंवा गो संवर्ग जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील ती ताब्यात घ्यावीत. जे मालक मोकाट फिरणाऱ्या गायी घेवून जाणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणेत येणार आहेत. एखाद्या जनावरास लम्पी सदृश्य आजार झालेला असेल तर  तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी, पशु वैद्यकीय दवाखाना, लायन्स ब्लॅड बँकेजवळ येथे संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे व त्यास विलगीकरणात ठेवावे.

 

  • लम्पी हा आजार संसर्गजन्य आजार असून तो फक्त गायी किंवा गो संवर्ग जनावरांमध्ये(animals ) होतो. त्याचा संसर्ग इतर अन्य जनावरांना किंवा मानवास होत नसल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. लम्पी हा चिकन, मटण व गाय व म्हशीचे दूध यातून होत नाही. मात्र असे पदार्थ सेवन करण्यापूर्वी आवश्यक त्या तापमानावर उकळून किंवा शिजवून खावेत, असे आवाहन महापालिके च्यावतीने आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी केले आहे.

Smart News:-