इचलकरंजीतील युवकाचा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात बळी!

खड्डा चुकवण्याच्या(inferior) प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी कुटुंबास नुकसानभरपाई आणि रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित मक्तेदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर-रुई मार्गाचे सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण केले आहे. या निकृष्ट (inferior)कामामुळे ओढ्यावरील म्हसोबा मंदिराजवळ आडवा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रशांत मोहिते हा दुचाकीवरून कागलवरून कोरोचीला निघाला होता. रुई मार्गावरून कबनूर ओढ्यालगत आल्यानंतर यावेळी समोरून येणाऱ्या आसिफ याने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोहिते याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात आसिफ मुल्लाणी रस्त्यावर फरपटत गेला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामामुळे मुल्लाणी याचा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी आज रास्ता रोको आंदोलन केले.

मुल्लाणी कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि रस्ते कामाची चौकशी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित मक्तेदार, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्वरित कारवाई न झाल्यास कबनूर मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनात आदिनाथ कामगोंडा, महंमद मुजावर, आण्णा मकोटे, असिफ मोमीन, रोहित पाटील, भिकाजी आपुगडे, तानाजी कोकणे, कृष्णात मगर, बादशहा यंबतनाळ, रोहित कांबळे यांच्यासह भागातील नागरीक सहभागी झाले होते.

हेही वाचा :