राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राजकीय(politics) हालचालींना वेग आलाय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाहीत. काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची मागणी केलीय. यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद, गृह आणि नगरविकाससह महत्वांच्या खात्यांची मागणी केलीय. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे, तरी देखील मुख्यमंत्री (politics)ठरवण्यासाठी इथके दिवस लागत आहेत. मुख्यमंत्री ठरला असेल तर त्याचे स्वागत करू. निकाल मान्य नसेल तरी आकडे महत्वाचे असतात, असं विधान राऊतांनी केलंय. तर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय.
वयाच्या 95व्या वर्षी आंदोलन करावं लागतंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? पोलीस महासंचालक कोण असणार? मुंबई आयुक्त कोण असावं? हे दिल्लीतून पंतप्रधान मोदी अन् अमित शाह ठरवत असून महाराष्ट्राचं नेतृत्व मान झुकवून उभं असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केलीय.
महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 50 पेक्षा जास्त जागा तर अजित पवार यांना 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्यात. भाजपला 132 जागा मिळाल्यात. त्यामुळं मंत्रिपदाचं वाटप नेमकं कसं करायचं, हा त्यांचा प्रश्न असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्रीपद मागू शकतात, असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलाय. ते राष्ट्रपती अन् उपराष्ट्रपतीपद देखील मागू शकतात. मात्र, दिल्लीने डोळे वटारले तर शिंदेकडे काही पर्याय नसेल, अशी टीका राऊतानी केलीय. मागण्या पूर्ण झाल्या नाही, तरी सरकारमध्ये पडून राहतील असा घणाघात देखील राऊतांनी केलीय.
भाजपचं काम पूर्ण झालंय. महाराष्ट्र कमजोर करून झालाय. त्यामुळे भविष्यात यांचा पक्ष फुटला तर आश्चर्य वाटू नये, असा हल्लाबोल देखील राऊतांनी केलाय. काल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. यावर राऊत म्हणाले की, मावळत्या अन् उगवत्या सूर्यात फरक असतो. उगवत्या सुर्याचं तेज अधिक असतं, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
हेही वाचा :
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा पुन्हा ईडीच्या रडारवर
दिल्लीच्या बैठकीत मोठी खलबतं; 20 मिनिट चर्चा अन् शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी ठेवले मोठे प्रस्ताव
शाळांना सुट्टी ! मुसळधार पाऊस, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय