माझ्यासोबत लग्न (Marriage)केलं नाहीस, तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी तरुण देत असल्यामुळे कल्याणीने आत्महत्या केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्या ओळखीतील तरुणाकडून वारंवार छळ केला जात होता.माझ्यासोबत लग्न कर, लग्न केले नाही तर तुझे व माझे काही फोटो तुझ्या घरी दाखवेन, तुला बदनाम करेन, अशी धमकी तरुणाने दिली. या कारणाने विद्यार्थिनीने तिच्या रुमवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव कल्याणी वायाळ असून तिला त्रास देणाऱ्याचे नाव सुरज उर्फ शुभम मोरे (रा. मुळ गाव, देवगाव खवणे, ता. मंठा, जि. जालना) असे आहे.

या प्रकरणी मृत कल्याणी वायाळ हिची मोठी बहिण प्रतिक्षा परमेश्वर वायाळ, वय 24 वर्ष, रा. परिजात कॉलनी, सेलू, परभणी, हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची बहीण ही बीफार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शहरात शिकत होती. ती ग्रीव्हज कॉलनी, एन 7 येथील एका रुमवर तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती30 जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास प्रतिक्षाला कल्याणीच्या रुमवरील मैत्रिणींनी कॉल केला आणि तिची तब्येत खराब आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले. प्रतिक्षा वायाळ यांनी कल्याणीच्या फोनवर कॉल केला असता, पोलिसांनी तिने गळफास घेतल्याचे सांगितले.
कल्याणी वायाळ हिची सुरज मोरे याच्यासोबत चार ते पाच वर्षांपासून मैत्री होती. सुरज हा छत्रपती संभाजीनगरला असताना त्याची कल्याणीसोबत ओळख झाली होती. सुरज तिला लग्नासाठी मागे लागला होता. माझ्यासोबत लग्न(Marriage) केलं नाहीस, तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत होता. या मानसिक छळामुळे कल्याणीने आत्महत्या केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
या प्रकरणी सुरज मोरेच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल रमेश नेनेकर हे करीत आहेत.पंधरा दिवसांपूर्वी कल्याणी ही सावरगाव, ता. मंठा येथे आली होती. कल्याणी ही त्रस्त दिसत असल्याने प्रतिक्षा हिने तिला काही त्रास आहे का? अशी विचारणा केली. कल्याणी हिने बऱ्याच वेळेनंतर मोठ्या बहिणीसमोर तिची व्यथा मांडली. तिची ओळख सुरज मोरे याच्याशी चार ते पाच वर्षांपासून होती.
सुरज नेहमीच फोन करतो, माझ्यासोबत का बोलत नाहीस? तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तू लग्न केले नाही, तर तुझे-माझे फोटो तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याचे तिने सांगितले.कल्याणीने प्रतिक्षेला सर्व त्रासाबाबत सांगून, दिदी आई बाबांना कळालं तर खुप त्रास होईल. मी रक्षाबंधनापर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे राहते. त्यानंतर गावातच राहिल. असे सांगितले.दरम्यान, कल्याणी हिला त्रास देऊ नको हे प्रतिक्षा व तिचे पती अभिषेक काकडे यांनी सुरज मोरे याला भेटून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सुरज मोरे याने प्रतिक्षा हिचा पती अभिषेक काकडे यालाही अरेरावीची भाषा वापरून निघून गेला.
हेही वाचा :
देवदर्शन, बर्गर किंग, हॉटेल अन् चौघांचे मृतदेह…; ‘त्या’ भारतीयांसोबत अमेरिकेत घडलं काय? गूढ कायम
महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
प्रियंकाच्या लेकीचा क्युट अंदाज, स्वतः कॅमेरा पकडून वडिलांचा VIDEO केला शूट