घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

अनेकजण आपल्या घरात मांजर पाळतात. मांजर पाळणं शुभ असतं (Bird flu)असाही एक समज आहे. मात्र गोंडस दिसणाऱ्या या मांजरी तुमचं आरोग्य धोक्यात घालू शकतात. कारण कोंबड्यापाठोपाठ मांजरांनाही बर्ड फ्लूची लागण होऊ लागलीय. आतापर्यंत 18 मांजरींचा बर्ड् फ्लूमुळे मृत्यू झालाय. त्यामुळे तज्ज्ञांनी सर्वच मांजर प्रेमींना सावध राहण्याचा इशारा दिलाय.

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातील मांजरींना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आढळून आलंय. तिथं 18 मांजरींचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झालाय. 15 जानेवारी 2025 रोजी 4 आणि 22 जानेवारी 2025ला 3 मांजरींचे नमुने चाचणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत पाठवण्यात (Bird flu)आले. त्यातील 2 मांजरींना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरींना बर्ड फ्लूची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत कोंबड्यांमध्येच बर्ड फ्लू पाहायला मिळत होता. बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंडी खाण्याचं (Bird flu)प्रमाण घटलंय. मात्र आता तुमच्या घरातील मांजरीही सुरक्षित नाहीत हे मध्य प्रदेशातल्या घटनेतून स्पष्ट होतंय. त्यामुळे तुम्ही मांजरप्रेमी असेल तर आपल्या लाडक्या मांजरीची आणि स्वत:ची काळजी घ्या.

हेही वाचा :

‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत

‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग

खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या